ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी कायद्याची माहिती घ्यावी- प्राचार्य अर्जुन आबिटकर यांचे प्रतिपादन

0

तुरंबे :ग्रामपंचायत कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी सरपंच आणि सदस्यांनी ग्रामपंचायतीचे कायदे, कलमे यांची माहिती घेऊन कामकाज केले तर निश्चितच गावागावाचा विकास होईल असा विश्वास प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी व्यक्त केला.
तुरंबे येथे महाराष्ट्र शासनातर्फे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र गारगोटी यांच्यावतीने घेतलेल्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.
प्राचार्य आबिटकर पुढे म्हणाले, गावागावातील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांना ग्रामपंचायत कायदे, कलमे १ ते ३३ नमुने, माहितीचा अधिकार व ग्रामसभा आणि त्याखालील नियम ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्य याची माहिती असणे गरजेचे आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात पंचायतीचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्य, गावांतर्गत अतिक्रमण करणे, निधी कसा आणणे व त्याचा योग्य वापर कसा करणे आदी बाबीचे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी व्ही. आर. काजवे, व्ही. व्ही. चौगुले, अमृत मंगाने, सरपंच जयश्री भोईटे, ग्रामपंचायत सदस्य अजय खोत, शिवाजी मगदूम, अविनाश चिंदगे, लता पाटील यांच्यासह तालुक्यातील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here