अरबी समुद्राला ओखी चक्रीवादळाचा धोका

0

४ आणि ५ डिसेंबरला मासेमारांनी समुद्रात जाऊ नये !

सिंधुदुर्ग  : अरबी समुद्रात ओखी नावाचे वादळ तयार झाले असून, तामिळनाडु आणि केरळ  राज्यांना  ओखी चक्रीवादळने मोठा  तडाखा दिला आहे. हे वादळ गोवा ,महाराष्ट्र येथे घोघवण्याची शक्यता आहे,  याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यांवरील समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे ४ आणि ५ डिसेंबर या दोन दिवशी मासेमारांनी सुमद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, लहान बोटींनी सुद्धा समुद्रात जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

या वादळने समुद्रात भरकटलेल्या तामिळनाडु आणि केरळ या राज्यातील १५० मच्छिमार नौका देवगड बंदर येथे आश्रयाला आल्या आहेत. याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात देखील बंदरात देखील जवळपास ५०० मच्छिमार नौका आश्रयाला आल्या आहेत. समुद्रात मच्छीमारांनी जाऊ नये याकरिता  धोक्याचा बावटा लावण्यात आला आहे.  सध्या कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार व्यवसाय  बंद आहे. कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ६ डिसेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होत ते पुढे सरकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here