प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

0

सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी पिकासाठी ३० नोव्हेंबर तर अन्य जिल्ह्यांसाठी १ जानेवारीपर्यंत मुदत

मुंबई :राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2017-18 मध्ये राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभागाची अंतिम मुदत सोलापूर जिल्ह्यातील रब्बी ज्वारी पिकाकरिता 30 नोव्हेंबर आहे. अन्य जिल्ह्यांतील सर्व अधिसुचित पिकांकरिता सहभागाची मुदत 1 जानेवारी 2018 आहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

शेतकरी बांधवांना या योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व आपले सरकार सेवा केंद्र” (डिजीटल सेवा केंद्र) येथे विमा अर्ज सादर करता येतील. तरी शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज याठिकाणी जमा करावेत. त्याचबरोबर योजनेतील सहभागासाठी नजीकच्या विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here