कौलगेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

0

गडहिंग्लज :कौलगे येथील न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक काशिनाथ गाडे होते. डॉ. प्रवीण केसरकर, डॉ. अमोल पोवर यांच्या हस्ते दीपप्रज्वल व नटराज मूर्तीचे पूजन करण्यात आले. स्वागत एकनाथ देसाई यांनी केले. यावेळी २००७ च्या माजी विध्यार्थ्यानी शाळेला वॉटर प्युरिफायर दिल्याने माजी विध्यार्थी प्रतिनिधी प्रसाद फुलूंगडे यांचा सत्कार करण्यात आला. शाळेला मदत करणाऱ्या मनोहर पाटील, सुधाकर आर्दाळकर, सरपंच रेखा जाधव, आकाश जाधव, सीताराम जाधव, दत्त केसरकर, अर्चना वडर, जय पवार आदींचा सत्कार करण्यात आला. यानंतर झालेल्या कार्यक्रमात सुमारे १५० विध्यार्थानी विविध कलांचे सादरीकरण केले

 

. बळीराम पाटील व सुरेख नंदनवाडे यांनी विद्यार्थ्यांची वेशभूषा केली होती. सूत्रसंचलन विश्वजित चव्हाण यांनी तर आभार नामदेव यादव यांनी मानले. कार्यक्रमावचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख अरुण इशारे, दीपक सावंत यांनी केले होते.प्रमुख पाहुणे म्हणून कौलगे ग्रा.प.सदस्य महादेव केसरकर व पोलीस पाटील सौ. प्रणिता पोवार उपस्थित होते, कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here