सिंधुताई सपकाळ यांस यंदाचा “डॉ राममनोहर त्रिपाठी लोकसेवा सम्मान” जाहीर

0

प्रसिद्ध समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांस येत्या शनिवारी, 11 नोव्हेंबर 2017रोजी रायबरेली (उत्तर प्रदेश) येथे आयोजित एका कार्यक्रमात यंदाचा ‘डॉ राममनोहर त्रिपाठी लोकसेवा सम्मान’प्रदान केला जाईल. अनाथांची आई या नावाने ओळखल्या जाणा-या सिंधुताई यांनी अनाथ मुलांना नवी ओळख मिळवून देत त्यांस आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे करण्याचे पवित्र काम केले. आज त्यांचे विश्व तीच मंडळी आहेत.पटना येथील होतकरु मुलांना आयआयटीत प्रवेश सुगम करणारे ‘सुपर 30‘ चे संस्थापक आनंदकुमार यांस गेल्या वर्षी ‘डॉ राममनोहर त्रिपाठी लोकसेवा सम्मान’  प्रदान केला होता.डॉ त्रिपाठी यांची कर्मभूमि असलेली मुंबईत महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमीचा सर्वोच्च सम्मान समेत त्यांच्या नावावर आजही पुष्कळ पुरस्कार दिले जात आहेत. ‘आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी स्मारक समिति, रायबरेली’ या संस्थेने त्यांच्या जन्मभूमीत त्यांच्या नावाने सम्मान देण्यास वर्ष पासून सुरुवात केली असून वर्ष 2017 चा  ‘डॉ राममनोहर त्रिपाठी लोकसेवा सम्मान’ प्रसिद्ध समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांस प्रदान केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here