पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत अण्णा हजारे यांनी केला आंदोलनाचा एल्गार

0

सरफराज सनदी

मन की बात करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन अस्वच्छ असून लोकपाल बिल कमजोर करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केला असल्याचा आरोप जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे.तसेच शेतकऱ्यांनी आता रस्त्यावर उतरावे असे आवाहन केले आहे.दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या आटपाडी मध्ये आयोजित सभेत त्यांनी हा निशाण साधला आहे.

लोकपाल बिला सहा विविध मागण्यांसाठी २३ मार्चच्या दिल्लीतील आंदोलनाचा एल्गार आज जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगलीच्या आटपाडी या दुष्काळी गावातून केला आहे. लोकायुक्त आणि लोकपाल यांची नियुक्ती, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, कृषी मालाला योग्य हमीभाव, शेतकऱ्यांना ५ हजार रुपये पेंशन आणि निवडणूक पद्धतीत सुधारणा या मागण्यांसाठी आण्णा हजारे दिल्लीत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी अण्णा हजारे यांची आटपाडी मध्ये सभे आयोजित करण्यात आली होती .यावेळी अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना , आम्ही भ्रष्टाचाराला आळा घालण्याची कायदा करण्यासाठी पाच वर्षापासून मागणी करत आहोत पण ते काही झाले नाही .उलट लोकपाल कमजोर करणारा कायदा नरेंद्र मोदी यांनी कोणतीही चर्चा न करता एका दिवसात मंजूर करून घेतला.ही इंग्रजांची हुकमुशाही प्रमाणे आहे .अशी टीका यावेळी आण्णा हजारे यांनी मोदींच्यावर केली तसेच लोकपाल कमजोर करणारे बिल पास केल्यानंतर तीन वर्षात मी नरेंद्र मोदी यांना मी ३० पत्रे पाठवली पण एकही पत्राचे उत्तर आले नाही. कदाचित पंतप्रधान पदाचा इगो मोदींना आहे असा टोला लगावला आहे. तसेच शेतकरी धोरणा बाबत पंतप्रधान नरेंद्र केवळ बोलतात मात्र करत काही नाहीत.आज शेती मालाला भाव मिळत नाही .शेतकाऱ्यांचे कर्जाच्या व्याज धोरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले जात नाहीत . त्यामुळे या विरोधात देशातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र उभे राहिले पाहिजे . प्रसंगी रस्त्यावर उतरले पाहिजे आणि असे जेलभरो केले पाहिजे की ज मध्ये ही जागा शिल्लक राहिली नाही पाहिजे असे आवाहन यावेळी आण्णा हजारे यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले आहे . यावेळी या सभेसाठी सांगली ,सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातून हजारो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .आटपाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी या सभेचे आयोजन केले होते .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here