भाषांतरकार एक संधी..!

0

अक्षर-शब्दांच्या दुनियेत रमायला आवडते. वाचनानंद ही तुमची पहिली पसंती आहे. कला-साहित्य-संगीत या क्षेत्रातही थोडीफार गती आहे. तर तुमच्यासाठी भाषांतर क्षेत्रातील अमर्याद संधी खुल्या आहेत. चला तर मग या क्षेत्रातील करिअरच्या संधी जाणून घेवूयात खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी..

भाषांतर या क्षेत्रातही करिअर करण्याच्या अनेक संधी आहेत. कारण विविधतेने नटलेला आपला देश. भाषिक प्रांत रचनेमुळे भारतातच भाषांतराच्या संधी आपोआप निर्माण झाली आहे. शेकडो भाषांच्या देशात भाषांतरकारासाठी संधी नाहीत, असे होणारच नाही.
पण त्यासाठी अनुभव व शिक्षणाच्या सहाय्याने उत्तम भाषांतरकाराचे कौशल्य मिळविण्याची गरज आहे.
आशय किंवा मजकूर त्या- त्या विशिष्ट भाषेतील लोकांना कळेल अशा शब्दांमध्ये रुपांतरीत करून, त्या आशयाची बांधणी करणे म्हणजेच भाषांतर होय. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करताना, दोन्ही भाषांवर प्रभुत्त्व हवे. शिवाय, त्या-त्या भाषेतील बारकावे माहित असणे महत्त्वाचे. भाषांमध्ये वर्षागणिक नव-नवे शब्द तसेच काही वाक्प्रचारांची भर पडत असते, त्यांचही जाण असावी लागते. त्यासाठी सजग वाचनाची सवय असावी लागते. चिंतन-मनन आणि सातत्यपुर्ण श्रवण यातून भाषांतरकार यशस्वी होऊ शकतो.

भाषांतरकारासाठीच्या संधी कोण-कोणत्या

 • विविध दस्तावेज, कागदपत्रांचे भाषांतर.
 • शासकीय कामकाजातील अनुवाद.
 • पुस्तकांचे भाषांतर – कथा, कादंब-या, कथासंग्रह, कविता यांचे भाषांतर.
 • माध्यमांमधून भाषांतराची संधी – माध्यमांमध्ये आशय-मजकुराची मोठी गरज असते. वृत्तपत्रे, दुरचित्रवाणी वाहिन्या, त्यातही वृत्तवाहिन्या, चित्रपट, आकाशवाणी यात भाषांतरकारांची मोठी गरज असते.
 • दुरचित्रवाणी मालिका किंवा भारताच्या विविध प्रांतातील चित्रपटांसाठीही सबटायटल्स किंवा डबिंगसाठी भाषांतरकाराची आवश्यकता असते.
 • जाहिरात क्षेत्र यात मुद्रीत माध्यमांसह, दृक-श्राव्य आणि केवळ श्राव्य अशा जाहिरांतीसाठीही भाषांतरीत आशयाची आवश्यकता असते. विशेषतः बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या इंग्रजी किंवा अन्य विदेशी भाषांतील आशयही भारतातील विविध भाषांमध्ये प्रकाशित-प्रसारीत करावा लागतो. त्यासाठीही भाषांतराची मोठी गरज असते.
 • याला कॉपी रायटिंग असेही म्हणतात. दृक-श्राव्य जाहिरांतीचे विविध भाषांत ओघवते भाषांतर करावे लागते.
 • कला शाखेतील भाषा विज्ञान आणि त्याअनुषंगाने विविध भाषांचे अभ्यासक्रम पुर्ण करावे लागतात. अलिकडे स्क्रीप्ट रायटींग, कॅापी-रायटींगचेही दीर्घ तसेच अल्प मुदतीचे प्रशिक्षणही उपलब्ध झाले आहे.
 • जाहिरात क्षेत्रातील मान्यवर संस्थाच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमातही भाषांतराच्या प्रशिक्षणाचा समावेश असतो.


विविध विद्यापीठांतील भाषा विभाग.

 • व्यवस्थापन, जाहिरातीशी निगडीत व्यवस्थापन संस्था, महाविद्यालय आदी.
 • विदेशी भाषांसाठी मात्र अनेकविध पर्याय आहेत. त्यामध्ये ब्रिटीश कौन्सिलसह,
 • फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश शिकविणाऱ्या त्या-त्या देशांच्या संस्थाही देशात कार्यरत आहेत.
 • नेहमीचे अभ्यासक्रम पुर्ण करतानाच भाषांतर क्षेत्रात करिअर करण्याची संधीही आजमावता येते. हे महत्त्वाचे. शालेय शिक्षणापासून सकस साहित्य वाचनाची सवय लावणे यासाठी महत्त्वाचे ठरते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here