मुंबई –

सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे बॉलिवूडच्या दिशेने पाऊल टाकत आहे. मंजुळे आता नव्या सिनेमावर काम करत असून, या सिनेमात सिनेमाचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन दिसणार आहेत. नागराज मंजुळेंनी या कथेवर गेल्या एक ते दीड वर्षांपासून काम केले आणि अमिताभ बच्चन यांना जानेवारीमध्ये सिनेमाचे कथानक दाखवले. त्‍यानंतर अमिताभ बच्चन यांनी सिनेमाला होकार दिला. ‘सैराट’ने गेल्या वर्षी मराठी सिनेमाचे सर्व विक्रम मोडित काढले. त्यानंतर या सिनेमाचा तेलुगू आणि पंजाबी रिमेकही लवकरच भेटीला येणार आहे. तर निर्माता करण जोहरनेही हिंदी रिमेकसाठी या सिनेमाचे हक्क घेतले आहेत.

‘सैराट’च्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन नागराज मंजुळेच करणार आहे. करण जोहरची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच्या संहितेवर सध्या काम सुरु असून या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन पहिल्याच वेळेस एकत्र काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. डीएनए ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आगामी चित्रपटासाठीची संहिता नागराज मंजुळेने अमिताभ बच्चन यांना ऐकवली असून ते या चित्रपटासाठी फारच उत्साही असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता येत्या काळात नागराज मंजुळे आणि बिग बी एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी कोणत्या चित्रपटाचा नजराणा सादर करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here