शेतकऱ्यांच्या अजून आठ- दहा संघटना स्थापना झाल्या तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला काही फरक पडणार नाही

0

खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला टोला

कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नव्या संघटनेच्या पार्श्ववभूमीवर स्वाभिमानि शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी खोत यांच्यावर निशाण साधला आहे .शेतकऱ्यांच्या अजून आठदहा संघटना स्थापना झाल्या तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला काही फरक पडणार नाही आणि शेतकऱ्यांशी इमान,निष्ठा ,व शेतकरी कोणाच्या मागे हे मह्त्वाचे आहे असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला आहे. ते सांगली मध्ये बोलत होते. 

स्वाभिमानीतून कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची हक्कलपट्टी केल्यांनतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नव्या संघटनेची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले आहे.सदाभाऊ खोत यांच्या या नव्या संघटनेमुले स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसल्याचे बॊलले जात आहे. मात्र यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजु शेट्टी यांनी या चर्चेचे खंडन केले आहे.एखादी नवीन शेतकरी संघटना स्थापन झाली तर स्वाभिमानीचा मात्र एक टवका देखील निघणार नाही याची मला खात्री आहे असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त करत,सदाभाऊ खोत यांच्या स्थापन होणाऱ्या संघटनेचा आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यावर कोणताही परिणाम होणार नाही असे ठणकावून सांगितले आहे.

तसेच लोकसंख्येमध्ये निम्याहुन अधिक जर शेतकरी असतील तर शेतकऱ्याच्या आठदहा संघटना स्थापन झाल्या तर फारसा फरक पडत नाही असे म्हणत अशा नवीन स्थापन होनाऱ्या संघटनेचे आपण स्वागतच करतो असे शेट्टी म्हणाले. मात्र शेतकऱ्याशि इमान कुणाचा आहे ,शेतकऱ्यांशी निष्ठा कुणाशी आहे आणि शेतकरी कुणाच्या मागे आहे. हा विषय देखील मह्त्वाचा असल्याचें सांगत शेट्टी यांनी इतर शेतकरी सांगफहतना आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here