कागल तालुक्यातील स्त्रीशक्ती धनंजय महाडीकांच्या पाठीशी – शितल फराकटे

0

 

कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यासह जिल्ह्यातील हरएक गावा गावात सौ अरुंधती महाडिक यांनी महिला एकवटीचे काम जोराने सुरू केले आहे.

भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी नुकताच कागल तालुक्याचा दौरा केला. यात चिमगाव, शिंदेवाडी, फराकटेवाडी, यमगे, सुरुपली, कुरुकली, कौलगे या गावांमध्ये महिला मेळावे पार पडले. यावेळी बोलताना सौ अरुंधती महाडिक यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयात स्त्रीशक्तीचा मोठा वाटा असल्याचं नमूद केलं.आतापर्यंत जिल्ह्यातील स्त्रीशक्ती सदैव धनंजय महाडिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत आली आहार व ह्या निवडणुकीमध्येही अशीच साथ लाभू द्या असे आवाहन सौ. अरुंधती महाडिक यांनी केले.

त्यांनतर फराकटेवाडीच्या सरपंच सौ शितल फराकटे यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या आतापर्यंत केलेल्या चांगल्या कार्याची प्रशंसा केली तसेच त्यांनी म्हटले की धनंजय महाडिक यांच्या रूपानं आमचा भाऊ लोकसभेत जाणार आहे त्यामुळे अवघी स्त्रीशक्ती त्यांच्या विजयासाठी एकवटली असल्याचं नमूद केलं.

यावेळी धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ विविध गावातील महिला सरपंच व शेकडो महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here