प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ग्रामसभेवर सर्व ग्रामसेवकांचा बहिष्कार

प्रजासत्ताक दिनाची ग्रामसभा अन्य दिवशी असावी

0

रत्नागिरी :- प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ग्रामसभेवर सर्व ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकला आहे. प्रजासत्ताक दिनाची ग्रामसभा अन्य दिवशी असावी, अशी मागणी संघटनेतर्फे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ग्रामसभेस ग्रामसेवकांना वेठीस धरून मारहाणीच्या घटना राज्यभरात घडल्या आहेत. राजकारणातील रोष ग्रामसेवकांवर व्यक्त करून ग्रामसेवकांनाच टार्गेट केले जाते असे संघटनेचे म्हणणे आहे .
प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ध्वजवंदन कार्यक्रमाला ग्रामसेवक उपस्थित राहतील. मात्र ग्रामसभेस हजेरी लावणार नाहीत. याबाबत सर्व सरपंचांना ग्रामसेवकांनी लेखी पत्र देत अनुपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here