शिवसेना – भाजपचा कारभार म्हणजे  काळू- बाळूचा तमाशा – अजित पवार

0

खेळण्यातल्या वाघाच्या जबड्यात हात घालायला घाबरणारे लोक वाघाचे दात मोजायची भाषा करतात, असे म्हणत विधिमंडळ पक्षनेते आ.अजित पवार  यांनी सेने-भाजपातील दुफळीची खिल्ली उडवली. तसेच सत्ताधारी शिवसेना-भाजपाचा कारभार म्हणजे काळू-तमाशा असल्याची टीका यावेळी त्यांनी केली.

निफाड, लाखणगाव, येवला, पिंपळगाव- बसवंत ला शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले आहेत. मालाला भावच मिळत नव्हता म्हणून शेतकर्‍यांनी टोकाचे पाऊल उचलले होते. शेतकऱ्यांवर दरोड्याच्या केसेस दाखल केल्या तर सरकारला पळता भुई होईल, अशा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

सध्या चर्चेला ऊत आला आहे. चाय पे चर्चा, मुख्यमंत्र्याशी चर्चा आणि आता शिवसेना चर्चेला निघाली आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करायला यांनी शेतीतील काय कळतं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारने जीआर काढताना अकलेचा वापर केला असता तर ही वेळ आली नसती, असे म्हणतानाच एकही गरजू शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिला नाही पाहिजे, अशी ताकीदच त्यांनी दिली आहे. याशिवाय, भ्रष्टाचाराचे आरोप करून माझी बदनामी करण्यापेक्षा सरकार तुमचे आहे, तुम्ही चौकशी करा, असे आवाहनही पवार यांनी सरकारला केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here