महिलांनी स्वत:मधील सामर्थ्य ओळखावे : अन्नपुर्णा चराटी

0

कागल (विष्णूपंत इंगवले) :

महिला सबलीकरणाच्या हेतूने आजरा सुतगिरणीने सेनापती कापशी येथे गारमेंटची स्थापना करण्यात आली. महिला कोणतेही काम करण्यास सक्षम असतात, त्यांनी स्वतःला कमी लेखू नये. त्यांच्यामध्ये सर्वांना सामावून घेण्याची व जगवण्याची ताकद असते म्हणूनच महिलांची नावे नद्यांना दिली असावीत असे प्रतिपादन आजरा सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी यांनी केले. त्या सेनापती कापशी (ता. कागल) येथील आजरा सूत गिरणी संचलित कापशी शाखेतील गारमेंटचा प्रथम वर्धापन दिन जागतिक महिलादिनी संपन्न झाला. यानिमित्त सर्व कामगार महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी कापशी गारमेंटच्या वतीने करण्यात आली .

यावेळी आजरा गारमेंट प्रमुख शामली वाघ म्हणाल्या, सर्व कामगार महिलांनी आपल्या कामातील सौंदर्य शोधावे. हे करत असताना आपल्या कुटुंबाकडे व मुलाकडे दुर्लक्ष करू नका. तसेच एकत्रित काम करताना एकमेकांना समजून घ्या असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी संचालक सौरभ नाईक यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब नाईकवडी, जनरल मॅनेजर अमोघ वाघ यांनी मनोगत व्यक्त केले

याप्रसंगी आजरा सूतगिरणीचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर फडणीस, संचालिका मनिषा करूणकर, सचिन सटाले, श्रीमती वैशाली नाईक, सौ.शिलाताई सावंत, कापशी ग्रामपंचायत सदस्या व कापशी गारमेंट प्रमुख सौ.धनश्री नाईक, अमोल नाईक, प्रल्हाद इंगळे, स्वामी समर्थ पॅथाॅलाॅजीच्या सौ. स्वाती आठवले, सर्व कामगार महिला व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सौ. उज्वला चव्हाण यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here