अहमदनगरमध्ये भाजपाची शिवसेनेला धोबीपछाड!

0

अहमदनगर (प्रतिनिधी) :
अहमदनगर महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून शिवसेना मोठा पक्ष ठरला होता. पण महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला बाजी मारता आली नाही. भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस, बसप आणि अपक्षाच्या मदतीने शिवसेनेला शह दिला. महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी ३५ मतांची आवश्यकता होती.

 

भाजपाच्या बाबासाहेब वाकळे यांना भाजपाची १४, राष्ट्रवादीची १८, बसप ४ आणि अपक्ष १ अशी ३७ मते मिळाली. शिवसेनेच्या २४ नगरसेवकांपैकी २३ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. शिवसेनेचे उमदेवार बाळासाहेब बोराटे यांना २३ मते मिळणार हे निश्चित झाल्यानंतर शिवसेने या निवडणुकीवर बहिष्कार घातला. त्यामुळे भाजपाचे बाबासाहेब वाकळे ३७ विरुद्ध ० मतांनी विजयी झाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here