चाऱ्याचे पौष्टीक मूल्य वाढवण्याची गरज : डॉ. विराज वाघ

0

जरळी : अनियमित पावसामुळे शेती धोक्यात आली आहे. गरीब शेतकरी उदरनिर्वाहासाठी पशुपालन करतात. पण पावसाअभावी मुबलक चारा नाही. हिरवा चारा कमी आहे शिवाय त्याची प्रतही चांगली नाही. अशा परिस्थितीत उपलब्ध चाऱ्याचे पौष्टीक मूल्य वाढवण्याची गरज आहे. असे प्रतिपादन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विराज वाघ यांनी केले. मुत्नाळ ( ता. गडहिंग्लज )येथे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित चारा साक्षरता अभियान या कार्यक्रमात ते बोलत होते. गडहिंग्लज पंचायत समितीचे सभापती विजयराव पाटील अध्यक्षस्थानी होते. प.स.सदस्य इरप्पा हासुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. वाघ यांनी चाऱ्याचे पौष्टीक मूल्य कसे वाढवावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यामुळे जनावरांचे आरोग्य, प्रजनन क्षमता, दूध उत्पादन वाढवणे यासाठी पौष्टीक चारा उपयुक्त ठरतो असे मतही डॉ. वाघ यांनी व्यक्त केले. यावेळी प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून फेरी काढून चारा साक्षरता घोषणा दिल्या.
डॉ. वर्षाराणी पाटील, राजू पाटील,आप्पासाहेब घाटगे, दुरदुंडेश्वर पशुपालक मंडळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्डयानावर, सरपंच दीपा नाईक, उपसरपंच सुरेखा हट्टी, अरुण पाटील, रावसाहेब चिनगी, सिदगोंडा पाटील, , परगोंडा पाटील, पशुसंवर्धन विस्तार अधिकारी डॉ. कडलगे, डॉ. आशिष टेकाळे, डॉ. पी. एम. कांबळे, डॉ. एम. एल. वांद्रे, डॉ. मोरे, डॉ. विनायक पाटील, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. नाईकवाडे, यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

चारा साक्षरते बाबत मार्गदर्शन करताना डॉ. विराज वाघ सोबत पंचायत समिती सभापती विजयराव पाटील, राजेंद्र गड्डयानावर, डॉ. वर्षाराणी पाटील व अन्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here