गारगोटी मध्ये ३ ते ७ जानेवारी भव्य कृषी प्रदर्शन

0

गारगोटी : आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून ३ ते ७ जानेवारी या कालावधीत येथे कृषी व पशू प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
यासाठी विविध पीक उत्पादक, उत्कृष्ट ऊस व भात उत्पादक, सेंद्रिय शेती, ठिबक सिंचनाचा वापर, भाजीपाला उत्पादन, हरितगृह शेती करणाऱ्यांनी आपली नावे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे नोंदवावीत. तसेच जातिवंत जनावरे असलेल्या शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनात आपल्या जनावरांना सहभागी करावे. या प्रदर्शनात मोफत माती व पाणी परीक्षण केले जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनातील सहभागासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व जास्तीच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ.आबिटकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here