अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन

0

प्रसिद्ध  बॉलिवूड अभिनेते टॉम अल्टर यांचे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्वचेच्या कर्करोगाने ते आजारी होते. टॉम अल्टर यांनी शुक्रवारी रात्री मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास गेतला. त्यांनी ३०० हून अधिक सिनेमात काम केले आहे.

अमेरिकन वंशाचे भारतीय अभिनेते टॉम अल्टर यांनी १९७६ चरसचित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर शतरंज के खिलाडी’, ‘गांधी’, ‘क्रांती’, ‘बोस : द अनफरगॉटन हिरोआणि वीर झाराया चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली. अनेक टीव्ही मालिकांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. जुनूनया मालिकेत त्यांनी साकारलेली गँगस्टर केशव कलसीची भूमिका खूप गाजली होती. जुगलबंदी’, ‘भारत एक खोज’, ‘घुटन’, ‘शक्तीमान’, ‘मेरे घर आना जिंदगी’, ‘यहाँ के हम सिकंदरआदी मालिकांमधूनही त्यांनी अभिनयाची छाप पाडली.

ते दिग्दर्शन क्षेत्रातही काम करत होते. १९८० ते १९९० या दशकात त्यांनी क्रीडा पत्रकारिताही केली. क्रिकेट जगतात पाऊल ठेवण्यास सज्ज असणाऱ्या सचिन तेंडुलकरची टीव्हीवर मुलाखत घेणारे टॉम अल्टर पहिले पत्रकार होते.  त्यांना २००८मध्ये केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here