राज्यात शिक्षकांच्या नियुक्तीसाठी घेण्यात आली अभियोग्यता चाचणी

तब्बल एक लाख 71 हजार उमेदवारांचा उत्स्फूर्त सहभाग

0

प्रतिनिधी- जयश्री भिसे

मुंबई- काही वर्षांपासून राज्य शासनाच्या काही निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. यामुळे आतापासून गुणवत्तापूर्ण शिक्षकांचा शिक्षण व्यवस्थेत घेण्यासाठी शासनाने अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या चाचण्यांना राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण संगणकीय प्रणालीच्या आधारे राज्यातील 67 केंद्रांवर दररोज तीन प्रमाणे एकूण 30 बॅचेसमध्ये ही चाचणी घेण्यात आली आहे. त्यासाठी एक लाख 97 हजार 520 उमेदवारांनी नोंदणी केली होती, तर त्यातील एक लाख 71 हजार 348 उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here