मंत्रालयातील आयुक्त गणेश मुंदडा यांच्या गाडीला अपघात

0

गडहिंग्लज  येथील चंदगड गडहिंग्लज मार्गावर महागावनजीक आयुक्त गणेश मुंदडा यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात त्यांच्या मातोश्री चंद्रकला मुंदडा या गंभीर जखमी झाल्या. तर आयुक्त मुंदडा यांच्या पत्नीसह दोन मुलांना किरकोळ  दुखापत झाली.

अधिक माहितीनुसार, मुंदडा हे त्यांच्या स्विफ्ट डिजायर (क्रमांक MH 24 V 711) मधून त्यांच्या पत्नी मंजुषा, मुलगा मानव, मुलगी महिमा आणि आई चंद्रकला यांच्यासह कामानिमित्त चंदगड येथे आले होते. काम आवरून कोल्हापूर कडे परतत असताना महागावनजीक त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार झाडाला धडकली. त्यामध्ये चंद्रकला यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले. तर आयुक्त  मुंदडा यांच्यासह पत्नी आणि मुलांना किरकोळ दुखापत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here