मागण्या मान्य करा नाहीतर काम करणार नाही…अग्निशनम दलाच्या कर्मचा-यांचा इशारा

फायर ब्रिगेड अससोसिएशनचे आयुक्तांना मागण्यांचे पत्र

0

मुंबई : कमला मिल कंपाउंडमध्ये आगीची दुर्घटना घडली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन अधिका-यांवर कारवाई करत निलंबित करण्यात आले. यानंतर अग्निशमन दलातल्या कर्मचा-यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी याबाबत विविध मागण्यांचे पत्र आयुक्तांना देत. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर काम न करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कमला मिल दुर्घटनेनंतर अधिकारी एस एस शिंदे यांना निलंबित करण्यात आले तर राजेंद्र पाटील यांना अटक झाली आहे. या कारवाईमुळे अग्निशमन अधिकारी निराश झाले आहेत. विविध अस्थापनाना ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची पद्धत सदोष असल्याचे अधिकाऱयांचे म्हणणे आहे. कारवाईमुळे यापुढे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करणारे अधिकारी अडचणीत येण्याची भीतीही अधिकायांना वाटते आहे. या पार्श्वभूमीवर आज फायर ब्रिगेड अससोसिएशनचे अध्यक्ष ऍड प्रकाश देवदास यांनी अधिकाऱयांशी चर्चा करून मागण्यांचे पत्र आयुक्तांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here