आशिया चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी पुण्याचा अभिजित आणि कोल्हापूरचा सोनबा भारतीय संघात मंगोलिया देशात 21 ते 23 मार्च अखेर होणार झुंज

0

 

मुरगूड प्रतिनिधी
सोनिपत हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीत महाराष्ट्रातील अभिजित कटके आणि सोनबा गोंगाने यांची निवड भारतीय संघात झाली.युनायटेड वर्ल्ड रेसलिंग असोसिएशन यांच्या वतीने मंगोलिया देशात होणाऱ्या 23 वर्षाखालील आशियायी चॅम्पियन कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात त्यांची निवड झाली आहे.

सोनबा गोंगाने

मंगोलिया येथे होणाऱ्या आशियायी चॅम्पियन कुस्ती स्पर्धेसाठी कोल्हापूरचा निगवे खालसा येथील मल्ल सोनबा गोंगाने याची भारतीय संघात निवड झाली.तेवीस वर्षाखालील 61 किलो वजन गटात सोनबा आपले कसब पणाला लावणार आहे.
भारतीय संघ निवडीसाठी सोनपत येथे निवड चाचणी झाली.भारतीय सैन्य दलाचा मल्ल रोहित यास सहा गुणांनी हरवून व दिल्लीच्या सुमितवर दोन गुणांनी मात करून त्याने भारतीय संघातील आपले स्थान पक्के केले.भारतीय सेनादलात असणारा सोनबा पुणे घोरपडी येथील आर्मी स्पोर्ट्स सेंटर मध्ये कसून सराव घेत आहे.

गत सालचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यानेही 125 किलो वजन गटात नेत्रदीपक खेळ केला.या वर्षी अभिजितचा महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत पराभव झाला होता व त्याचे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बहुमान मिळवण्याचे स्वप्न भंगले होते पण त्यानंतरही पराभवाने खचून न जाता प्रबळ इच्छाशक्ती व मेहनतीच्या जोरावर त्याने आंतराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवले.अभिजित पुण्याच्या शिवराम वाजे तालमीचा मल्ल आहे.

मंगोलिया येथील उलनबटोर येथे 21 ते 23 मार्च रोजी ही स्पर्धा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here