आंतरराष्ट्रीय ऍबॅकस स्पर्धेत अभिजीत शिरसटरावला यश

0

महेश गोडगे

मोहोळ (प्रतिनिधी) : कोईंम्बतुर (तामिळनाडू) येथे झालेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय सीप ऍबॅकस स्पर्धेत अभिजीत विशाल शिरसटराव याने ऍडव्हान्स लेव्हल एक मध्ये दुसरा क्रमांक  मिळवला आहे. अभिजीत सध्या सेंट थॉमस हाइस्कूल सोलापूर येथे इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

              १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत अभिजीतने चांगली कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. सीप ऍबॅकस ही मलेशियन अकॅडमी असून सोलापुरातील ही पहिलीच अकॅडमी आहे. सीप ऍबॅकस हा मुलांमधील कौशल्य विकास वाढविण्याचा अभ्यास आहे. यामुळे मुलांची एकाग्रता, निरीक्षण क्षमता, श्रवण कौशल्य, कल्पना शक्ती, गणितीय कौशल्य व आत्मविश्वास वाढविण्यास मदत करते. यातील ब्रेन जिममुळे मुलांचा तणाव दूर होऊन मेंदूचा विकास होतो. मुलांची बुध्यांक पाच पटीने वाढण्याची हमी सीप ऍबॅकस अकॅडमी देते. हा अभ्यासक्रम ५ ते १३ वयोगटाच्या मुलांसाठी अत्यंत लाभदायक आहे.

             अशा या महत्त्वपूर्ण अशा स्पर्धेत  यशस्वी झालेल्या अभिजीतला सोलापूरचे राहुल माने यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल वर्गशिक्षक लक्ष्मण मलंगे, मुख्याध्यापक अन्थोनी कुट्टीकल, सर्व शिक्षक व विदयार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here