आत्याळ येथे व्यसनमुक्ती केंद्र सुरु

0

प्रतिनिधी गडहिंग्लज :
आत्याळ येथील सर्वेश क्लिनिक येथे आधार व्यसनमुक्ती केंद्राचे उदघाटन रोपट्याला पाणी घालून करण्यात आले.
स्वागत डॉ. सुनील निकम यांनी केले. ते म्हणाले, सामाजिक भावनेतून या केंद्राची सुरुवात केली असून याचा या परिसरातील जनतेला निश्चित लाभ होईल. या केंद्राच्या माध्यमातून जनतेला योग्य मार्गदर्शन करण्याची ग्वाही त्यांनी दिला. समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे सादिक शेख यांनी यावेळी व्यसनमुक्ती अभियान संदर्भात मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, व्यसनाचे तोटे प्रबोधनाव्दारे सांगितले जातात पण व्यसन कसे सोडवायचे ते सांगितले जात नाही. भारतात व्यसनाधीनतेचे प्रमाण लोकसंख्येच्या ७० टक्के म्हणजे गंभीर असल्याचे सांगितले. प्रा. शैलेश पाटील यांनी या केंद्राला शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. शुभांगी निकम यांच्यासह इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here