कु. आर्या पाटील हीला राज्यस्तरीय ‘ आजची रणरागिणी ‘ व युवा उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार जाहीर

0

गडहिंग्लज : ‘‘ असे जगावे दुनियामध्ये, आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. ” असेच खडतर, आव्हानात्मक, विकट परिस्थितीशी सामना करत, संघर्षमय जीवनातुन राखेतून उडणाऱ्या फिनिस्क पक्षाप्रमाणे गरुडझेप घेणाऱ्या छत्रपती शिवाजी विद्यालय, गडहिंग्लज या प्रशालेत ७ वी इयत्तेत शिकणाऱ्या कु. आर्या अरुण पाटील (वय १२ वर्ष) हिस ‘राज्यस्तरीय आजची रणरागीनी’ व ‘युवा उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार ‘ जाहीर झालेला आहे.
राज्य पूर्व प्राथमिक शिष्यवृत्तीधारक बी. डी. एस ; गणित प्राविण्य परीक्षा, तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, निबंधलेखन या बौद्धिक, वैचारिक स्पर्धांतील कु. आर्या हिचे यश वाखाण्यासारखे असून शाळेत ती मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहे. या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर ज्या वयात खेळायचे, बागडायचे असते अशा ५ व्या वर्षीच्या बालवयात आर्या हिने आपल्याकडे सुविधेची कमतरता दुर्लक्षित असणाऱ्या स्केटिंग खेळात तिने सलग ३१ तास स्केटिंग करून ‘ लिम्का बुक ” गिनीज बुक ‘ एशिया बुक, वर्ल्ड बुक, इंडिया बुक, अमेंचेव्हर बुक मध्ये मुसळधार पावसात आपल्या खेळाची नोंद करून जागतिक पातळीवर आपले व शाळेचे नाव कोरले.
त्यानंतर तिने ५१ तास, १२१ तास सलग स्केटिंग करून मंगळूर. गुजरात, बेंगलोर, म्हैसूर, नागपूर, पुणे, मुंबई, सातारा, सांगली, चिक्कोडी, कोल्हापूर, निपाणी येथे आपल्या खेळाचे कौशल्य दाखवत राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवली आहे. मागील महिन्यात बेळगाव येथे झालेल्या ‘रूरल गेम स्केटिंग नॅशनल कॉम्पिटिशयन’ या राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कामे करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. स्केटिंग खेळाबरोबर सलग तीन वर्षे राज स्पोर्ट्स आयोजित अथलेटिक्स स्पर्धेत व गडहिंग्लज नागरपालिकेमार्फत आंतरशालेय स्पर्धेतील धावणे, लांब उडी, उंच उडी या वैयक्तिक खेळाबरोबर रिले व खो-खो तील कामगिरीबद्दल ‘उत्कृष्ट खेळाडू’ म्हणून सन्मानित केले आहे. शाळेतील क्रीडा स्पर्धेतील प्रथम क्रमांकाने विभूषित असणाऱ्या आर्याने आजअखेर १५० पदक, १४० सन्मानचिन्ह, १६० च्यावर प्रमाणपत्रांची संपत्ती संपादन केली आहे.
आर्याची आई एम. आर. कॉलेज गडहिंग्लज येथे प्राध्यापिका असून तिचे वडील आदर्श प्रशाला, कोल्हापूर येथे प्रयोगशाळा परिचर व तिची छोटी बहीण कु. —– स्वरा ही बालवाडीत शिकत आहे. आईवडिलांचे व स्केटिंग प्रशिक्षक अजितसिंग शिलेदार, प्रमिला शिलेदार यांच्या मार्गदर्शनाखाली आर्या आपल्या सुक्षकलागुणांना वाव देत आहे. अतिशय सोज्वळ, जिद्दी, खडतर मेहनत, शांत, मनमिळावू, संघटन कौशल्य, सह्कार्यकृती, आनंदी, समंजस असणाऱ्या कु. आर्याच्या या गुणांचा व यशाचा चढता आलेख पाहून ‘ आजची रणरागिनी ‘ च्या संपादिका रेखाताई पाटील यांनी तिला ‘ राज्यस्तरीय आजची रणरागिनी ‘ व ‘ राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार ‘ जाहीर केलेला आहे. असे पत्रकाद्वारे प्रसिद्ध केलेला आहे.
तिचा हा पुरस्कार वितरण सोहळा सिने अभिनेत्री सुपरस्टार आणि मराठी चित्रपट सृष्टीतील रणरागिनी अलका कुबल ( आह्ल्ये ), आमदार संध्यादेवी कुपेकर, नाविदा मुश्रीफ, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार रामलिंग चव्हाण, परिविराधीन पोलीस उपअधीक्षक डॉ. रोहिणी साळुंखे, गटविकास अधिकारी सीमा जगताप, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर, सतीश पाटील, सुनीता रेडेकर, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, डी. वाय. एस. पी. अनिल सावंत यांच्या हस्ते रविवार दि. ३ जानेवारी २०१९ रोजी जडेयसिध्देश्वर आश्रम बेलबाग, वडरगे रोड, गडहिंग्लज येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here