आरळगुंडीत माती नाला बांध घालण्यास मंजुरी

0

कागल (प्रतिनिधी) :

आरळगुंडी (ता. भुदरगड) येथे माती नाला बांध घालण्याच्या कामास शासनाची मंजुरी मिळाली असून हे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. म्हाडा पुणे तसेच शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळेच बांध घालण्याच्या कामास शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता चिकोत्रा धरण भरण्यास मदत होणार आहे.

अनेक वर्षांनंतर यावेळी चिकोत्रा धरण १०० टक्के भरले. हे धरण कायमस्वरूपी १०० टक्के भरावे यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह जलयुक्त शिवार अध्यक्ष उमेश देसाई यांच्या सोबत प्रत्यक्ष त्या विभागाची पाहणी केली होती. ज्यादा पाणी संचय होणाऱ्या जागेचा सर्व्हे करून त्यावर उपाययोजना म्हणून नाले बंधाऱ्याद्वारे सदरचे पाणी चिकोत्रा धरणाकडे वळवण्याबाबत चर्चा करुन, त्यासंबंधी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्फत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. याची फलनिष्पत्ती म्हणून या एकूणच कामासाठी २७ लाखाचा निधी मंजूर कलेची घोषणा बोळाविवाडी येथील कार्यक्रमात पालक मंत्री पाटील यांनी केली होती. त्यामुळे समरजितसिंह घाटगे यांच्या या प्रयत्नास यश आले असून एकूण कामा अंतर्गत गारगोटी परिक्षेत्रातील मौजे आरळगुंडी येथे ‘जल मृदा संधारणाची कामे’या योजने अंतर्गत ९६ मीटरचा माती नाला बंधारा घालण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या कामाची निविदा नुकतीच प्रकाशित झाली आहे. त्यामुळे या कामास आता गती मिळाली असुन चिकोत्रा धरण भरण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here