ऑक्टोबर २०१९ मध्ये अन्नपुर्णाचा पहिला गळीत हंगाम : माजी आ. घाटगे

0

कागल (प्रतिनिधी) :

येत्या २०१९ च्या आॅक्टोबरला अन्नपूर्णा साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम सुरु होईल. प्रतिदिन १५०० टन गाळप क्षमतेचा कारखाना उभारणीकरीता ३१ कोटी रूपयांच्या फायनान्सला मंजुरी मिळाली आहेे. आता कारखाना उभारणी मार्ग मोकळा झाल्याचे प्रतिपादन माजी आमदार संजयबाबा घाटगे यानी केले. ते कासारी (ता. कागल) येथे विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धनराज घाटगे होते.

संजयबाबा घाटगे यांच्या हस्ते दलित वस्ती सुधारणा योजनेतंर्गत मातंग वसाहतीतील ५ लाख रु. खर्चाचे डांबरी रस्त्याचे, कासारी प्राथमिक शाळेच्या २.४० लाख रु. खर्चाच्या खोल्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बाळासाहेब पाटील पतसंस्थेच्या स्थापनेला २५ वर्ष पुर्ण झालेबद्दल सभासदांना भेटवस्तू वाटप घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले.

घाटगे म्हणाले, सभासद, कार्यकर्ते व जनतेच्या पाठबळावर ६ कोटी शेअर्स रक्कम जमा झाली. ३१ कोटी रूपयांचा फायनान्स मंजुरी मिळाल्याने लवकरच मिळणार आहे. बाॅयलर, टरबाईन्स उभारणी करिता अँडव्हान्स दिला आहे. त्यामुळे कारखाना उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

माजी सभापती दत्तात्रय वालावलकर म्हणाले, जि. प. शिक्षण सभापती अंबरिश घाटगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे २ हजार प्राथमिक शाळा डिजिटल केल्या आहेत. शिल्लक शाळां लवकरच डिजिटल होतील. चिकोत्रा खोऱ्यातील प्राथमिक शाळांच्या खोल्या बांधकाम करण्यासाठी १ कोटी रूपयांचा निधी दिला आहे.

संजय गांधी निराधार समितिचे अध्यक्ष धनराज घाटगे, विठ्ठल कांबळे, धनाजी काटे यानी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच तानाजी पाटील यानी केले. कार्यक्रमाला जनाबाई पाटील, सरपंच राणीताई कांबळे, कु. आश्विनी पाटील, जोतिबा सुतार, मनिषा परबकर, दयानंद पाटील, ललिता इंगवले, सोनुसिंह घाटगे, नुरमहंमद देसाई, मुख्याध्यापक शिवाजी पोवार उपस्थित होते. सुत्रसंचालन आनंदा साळोखे व आभार विलास कांबळे यानी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here