‘आम आदमी पार्टी’ ला मिळणार राज्यात बळ ?

शिवराज्य पक्षाचे 'आप'मध्ये विलीनीकरण

0

प्रतिनीधी – राजू म्हस्के

औरंगाबाद : अरविंद केजरीवाल 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ जयंतीदिनी सिंदखेड राजा येथे येणार आहेत. या ठिकाणी केजरीवाल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आपच्या माध्यमातून राज्यात नवा पर्याय निर्माण झाला आहे. भाजपने विकासाला प्राधान्य देण्याऐवजी जाती, धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम केल्याचा आरोप ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.

राज्यात आम आदमी पक्षाला बळ मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या सिंदखेड राजा येथे होणाऱ्या सभेत शिवराज्य पक्ष आम आदमी पक्षात विलीन केला जाणार आहे.  शिवराज्य पक्षाचे सर्वेसर्वा ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.  सुधीर सावंत यांच्या आम आदमी पार्टीत येण्याने पक्षाला बळ मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here