जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धेत आजरा हायस्कूल प्रथम

0

प्रतिनिधी आजरा :
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उंच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ याच्या विद्यमाने जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये आजरा हायस्कूलच्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकाविला.
कोल्हापूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धेत आजरा हायस्कूलच्यावतीने ग्रामीण मुली या प्रकारामध्ये तप्त दाही दिशा ही एकांकिका सादर करण्यात आली. या एकांकिकातील अभिनयाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक समृद्धी सुतार हिला देण्यात आले. दिर्ग्दर्शनाचे पारितोषिक अशोक पोतदार यांना देण्यात आले.
या एकांकिकेमध्ये मयुरी टकेकर, सलोनी पाटील, समृद्धी सुतार, सानिया नार्वेकर, नुपूर कडवाले, राजलक्ष्मी येसणे, इरम वाडीकर, मधुरा महाजन, साहिल सय्यद या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जातीय दंगलीमध्ये पोळलेल्या स्त्रियांच्या मनातील व्देष नाहीसा करणाऱ्या स्त्री शक्तीची कहाणी हा विषय एकांकिमध्ये प्रभावीपणे मांडला. या विद्यार्थ्यांना व्ही. ए. पोतदार, सौ. एम. वाय. येसणे, व्ही. एम. पाटील, टी. एम. पाटील, संस्थेचे सल्लागार आय. के. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तर मुख्याध्यापक एस. बी. लुगडे, पर्यवेक्षक बी.एल. गौंडाडकर यांचे प्रोत्साहन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here