खा. महाडिकांच्या पाठीशी राहण्याचे अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

0

कोल्हापूर (प्रतिनिधी) :
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार जो उमेदवार जाहीर करतील त्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे राहून त्याला निवडून द्या. त्याठिकाणी मग कोणताही नेता असो, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कागल येथील सभेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात निर्धार परिवर्तन यात्रा काढलेली आहे. ती सोमवारी कोल्हापूरला पोहोचली. त्यामध्ये अजित पवार बोलत होते.

यावेळेस तुम्ही माझे ऐका, तुम्हाला त्याचा मोबदला व्याजासहीत परत करेन, असेही पवार यावेळी म्हणाले. मागील अनेक दिवसांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. तसेच अनेकांच्या मनात याबद्दल उत्सुकताही आहे. तर, विद्यमान खा. धनंजय महाडिक यांच्यावर कार्यकर्ते नाराज आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन अजित पवारांना उमेदवारीवर बोलने भाग पडले.

कोल्हापूरमध्ये ४ ठिकाणी परिवर्तन यात्रा झाल्या. मात्र, कागल येथे झालेल्या पहिल्याच सभेत राष्ट्रवादीची गटबाजी समोर आली आहे. सभा सुरू असताना खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या भाषणात आमदार मुश्रीफ यांचे नाव न घेतल्यामुळे मुश्रीफ यांच्या समर्थकांनी महाडिक यांचे भाषण मध्येच थांबवले. या संपूर्ण प्रकारानंतर तर ही गटबाजी प्रकाशात आली आहे.

हाच धागा पकडून अजित पवार यांनी आपल्या भाषणात कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरून कार्यकर्त्यांना चांगलेच ठणकावले. ते म्हणाले, आपली सरकार विरोधात लढाई सुरू आहे. राष्ट्रवादीला प्रत्येक जागा महत्वाची असून कार्यकर्त्यांनी याचा विचार केला पाहिजे. शिवाय पवार साहेब जो निर्णय घेतली आणि जो उमेदवार जाहीर करतील त्याच्या पाठीमागे राहून त्या उमेदवाराला निवडून आणायचा विचार करायला हवा. दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या या विनंती आवाहनामुळे खासदार धनंजय महाडीक यांनाच पुन्हा उमेदवारी असणार असे स्पष्ट संकेत देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here