आजरा महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयाची कार्यशाळा संपन्न

0

आजरा (प्रतिनिधी) :

आजरा महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ अंतर्गत अग्रणी महाविद्यालयाची ‘दैनंदिन जीवनातील स्वसंरक्षणाची गरज’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. होनगेकर हे होते. अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्राचार्य होनगेकर म्हणाले की, निरोगी जीवनाची गुरुकिल्ली व्यायाम व योग्य आहार आहे. त्याचबरोबर प्रत्येकाने स्वसंरक्षण केले पाहिजे.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रा. राहुल लहाने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने सक्षम असले पाहिजे तसेच स्वतः जवळ असलेल्या वस्तू उदा. पेन, इतर साधने इ. वापर करता येतो. त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना अनुभूती दिली. मुलींना स्वसंरक्षणाचे विविध पध्द्ती सांगितल्या.

कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रामध्ये प्रा. विकास अतिग्रे यांनी ‘व्यायामाचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. व्यायाम हा सर्व वयोगटातील लोकांच्यासाठी आवश्यक आहे. व्यायामाद्वारे रोग प्रतिकारक शक्ती वाढवता येते. विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढविण्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे. चालणे, सायकल चालवणे, जिममध्ये जाणे, सूर्यनमस्कार इ. अनेक व्यायाम प्रकार आज उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घेतला पाहिजे.

या कार्यशाळेसाठी आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यातील विविध महाविद्यालयातील ६५ विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेचा समारोप उपस्थितीतांना प्रमाणपत्राचे वितरण करून झाला. या कार्यशाळेचे स्वागत प्रा. डॉ. रणजित पवार यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. धनंजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अविनाश वर्धन यांनी केले. आभार प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांनी मानले. या कार्यशाळेचे आयोजन आजरा महाविद्यालयातील अग्रणी महाविद्यालय विभागाने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here