चंदगड,आजरा, गडहिंग्लज मध्ये आज भगवे वादळ घुमणार…..

0

गडहिंग्लज (प्रतिनिधी) अभिजीत मांगले : शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे हे आज, मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांत जिल्ह्यात आठ ठिकाणी विविध कार्यक्रमाने ते उपस्थित राहणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदित्य ठाकरेंचा हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.
मागील वर्षी सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आणि आज आदित्य ठाकरे यांचा दौरा या वरून सध्या तरी हेच दिसत आहे की चंदगडमध्ये भगवे वादळ जोरजोरात धडकत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिणोळी व नेसरी येथील सभेला झालेली लक्षणीय गर्दी, नेते व कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी, आपआपल्या परीने पक्षप्रमुख यांना आकर्षित करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आणि आता त्या पाठोपाठ युवानेते आदित्य ठाकरे यांचा आज चंदगड,आजरा,गडहिंग्लज दौरा. जरी हा दौरा राजकीय नसला तरी सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मागील सात दिवसापासूनच कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू झाली आहे, युवानेते आदित्य ठाकरेंचा दौरा जास्तीत जास्त कसा यशस्वी करता येईल यावर सगळ्यांनी लक्ष दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकेत ह्या दौऱ्याचा नक्कीच फायदा होणार आहे यात शंका नाही.

आदित्य ठाकरे आज, सकाळी आठ वाजता मुंबईहून बेळगाव विमानतळावर येणार आहेत. तेथून शिनोळी (ता. चंदगड) येथे  संग्राम कुपेकर यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन ते करणार आहेत.
दुपारी साडेबारा वाजता यशवंत रेडेकर महाविद्यालय, नेसरीच्या कॉलेज आॅफ फार्मसी युनीटचे उद्घाटन, दुपारी पावणेदोन वाजता आजरा येथे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन व केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय, गडहिंग्लजच्या ‘एन. आय. सी. यू.’ विभागाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
तरी जास्तीतजास्त संख्येने आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी उपस्थित रहावे असे आवाहन संग्रामसिंह कुपेकर व रियाजभाई शमनजी यांनी टीम न्युजटेलशी बोलताना केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here