पालिकेच्या रस्ता घोटाळ्यात ९६ अभियंते दोषी

पालिकेच्या ३४ रस्ता घोटाळ्यात १०० अभियंत्यांपैकी ९६ दोषी 

0

सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख निर्माण केलेल्या  मुंबई महापालिकेत दोन वर्षांपूर्वी रस्ता घोटाळा झाल्याचे झाल्यावर चौकशी समिती नेमण्यात आली. त्यानुसार २३४ पैकी फक्त ३४ रस्ता घोटाळ्यांची चौकशी पूर्ण झाली असून, त्यातील १०० अभियंत्यांपैकी ९६ अभियंते दोषी आढळले आहेत.

यापैकी चारजणांना पालिकेच्या सेवेतून कायमचा ‘डच्चू’ दिला आहे. तर सातजणांना वरच्या वरिष्ठ पदावरुन कनिष्ट पदावर ढकलण्यात आलंय. तर  तीन दोषींच्या निवृत्ती वेतनात कपात केली आहे. अन्य दोषी अभियंत्यांची कायम वेतनवाढ १ ते ३ वर्षांसाठी बंद केली असून ११ जणांना रोख दंड करण्यात आला आहे. हा घोटाळा ३५२ कोटी रुपयांचा होता.

माजी महापौर आणि शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहल आंबेकर यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये रस्ता घोटाळ्यासंबंधी पालिकेच्या आयुक्तांकडे लेखी तक्रार केल्यानंतर चौकशीची चक्रे फिरली. त्यानंतर आयुक्तांनी तत्कालिन अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती.

या समितीने २३४ पैकी ३४ रस्त्यांची चौकशी पूर्ण केली असून, उर्वरित २०० रस्त्यांच्या कामांतील त्रुटीची जबाबदारी निश्चित करण्याचे काम प्रगतीपथावर असून, त्याबाबतचा अहवाल लवकरच देण्यात येणार आहे.

अतिरिक्त आयुक्त देशमुख यांच्या चौकशी अहवालानंतर कामांच्या स्वरुपानुसार जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी उपायुक्त विशेष अभियांत्रिकी रमेश बांबळे व प्रमुख चौकशी अधिकारी राजेंद्र रेळेकर यांना दिले होते. त्यांनी आयुक्तांकडे सादर केलेल्या अहवालावर आयुक्तांनी शिक्षेचे आदेश बजावले आहेत. या अहवालाची प्रत महापौरांना दिली आहे.

या रस्त्यांच्या चौकशीत वरील ३४ रस्त्यांतील १०० अभियंते समाविष्ट असल्यामुळे २०० रस्त्यांच्या अंतिम अहवालानंतर त्यांच्या शिक्षेत बदल होणे शक्य आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पालिकेच्या १०० अभियंत्यांपैकी ९६ अभियंते दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. यापैकी ४ जणांना सेवेतून काढले आहे, तर तीन अभियंत्यांच्या निवृत्तीवेतनात कपात केली असून, सहा अभियंत्यांना मुळ वेतनावर नेले आहे, तीन वर्षांसाठी एका अभियंत्याची कायम वेतनवाढ, दोन वर्षांसाठी पाच अभियंत्यांची कायम वेतनवाढ आणि एक वर्षासाठी २५ अभियंत्यांची कायम वेतनवाढ रोखली आहे आणि एक वर्षासाठी तात्पुरती वेतनवाढ बंद केलेले ३४ अभियंते आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here