९१ वे मराठी साहित्य संमेलन बुलढाण्यात

0

९१ वे अखिल भारतील मराठी साहित्य संमेलन बुलढाण्यातील हिवरा आश्रमात होणार आहे. दिल्ली आणि बडोदा या महानगरांसोबतच्या लढाईत बुलढाण्यानं बाजी मारली आहे.


सन १८७८ मध्ये पहिले साहित्य संमेलन पुण्यात झाले होते. जवळपास १३९ वर्षात आतापर्यंत ९० अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं झालीत. पण एकही बुल
ढाण्यात झाले नव्हते. अकोला जिल्ह्यात दोन वेळा संमेलन आयोजित झाले. हा बहुमान बुलडाण्याला मिळावा, यासाठी विवेकानंद आश्रम संस्थेकडून युद्धस्तरावर प्रयत्न करण्यात आला. मे २०१७ मध्ये मंडळाला रितसर निमंत्रण देण्यात आले.

संमेलनस्थळासाठी राज्यभरातून ४ आणि राज्याबाहेरील दिल्ली व बडोदा, असे एकुण ६ प्रस्ताव साहित्य मंडळाकडे आले होते. त्यापैकी हिवरा आश्रम, दिल्ली आणि बडोदा या तीन ठिकाणांचाच विचार करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी स्थळ पाहणी समिती हिवरा आश्रममध्ये धडकली. अध्यक्ष श्रीपाद जोशी, उपाध्यक्ष चंद्रकांत भाले, कोषाध्यक्ष विलास जोशी, कार्यवाहक डॉ. इंद्रजीत ओरके, सदस्य पद्माकर कुलकर्णी, प्रा. डॉ. दादा गोरे अशा सहा जणांच्या समितीने स्थळाची पाहणी केली.तब्बल चार तासांच्या पाहणीनंतर समितीने सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात नागपुरात संमेलनस्थळाच्या निश्‍चितीबाबत महत्वूपर्ण बैठक झाली. दिल्लीतील आयोजक संस्थेने ऐनवेळी माघार घेतल्याने बडोदा व हिवरा आश्रम हे दोनच पर्याय महामंडळापुढे उरले होते. यजमानपदाबाबत एकमत नसल्याने आज मतदान झाले यामध्ये ५ विरुद्ध १ मताने हिवरा आश्रमवर शिक्कामोर्तब करण्यात आले.


बुल
ढाणा जिल्ह्यातील साहित्यिकांनी या घोषणेचे स्वागत केले आहे. संमेलनस्थळ घोषित असले असले तरी संमेलनाचे अध्यक्ष आणि संमेलनाची तारीख अद्याप निश्‍चित व्हायची आहे. या वर्षाच्या अखेरीस किंवा जानेवारी २०१८ मध्ये संमेलन होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांकडून कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here