साखर कारखान्यांना ७०० पोलिसांचा बंदोबस्त

0

कोल्हापूर : जिल्हातील साखर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे करून शुक्रवारी २३०० रुपयांची पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली. त्यामुळे एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी तीव्र आंदोलन करून शिरोलीमधील तीन साखर कारखान्यांची विभागीय कार्यालये फोडली. भविष्यात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानीने दिला आहे. या पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या निदर्शानुसार जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांसमोर ७०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
एकरकमी एफआरपीवर ठाम असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमकपणे आंदोलन सुरु केले आहे. याची गंभीर दाखल घेत कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी रविवारी ७०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here