अॅथलेटिक्स निवड चाचणी स्पर्धेत ३०० स्पर्धकांचा सहभाग

0

-राजू म्हस्के-

विशाखापट्टणम येथे होणाऱ्या राष्ट्रीय आंतर जिल्हा ज्युनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी औरंगाबाद जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. यात १४ आणि १६ खालील ३०० मुलं – मुलींनी सहभाग नोंदविला.

विद्यापीठाच्या अॅथलेटिक्स मैदानावर झालेल्या या निवड चाचणी स्पर्धेचे उदघाटन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मा. आ. श्रीकांत जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ फुलचंद सलामपुरे, कोषाध्यक्ष प्राचार्य बाबुराव गंगावणे आणि प्राचार्या शशिकला निळवंत यांची विशेष उपस्तीथी होती.

निवड चाचणी स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे-

१४ वर्षा खालची मुली- १०० मी-१)साक्षी चव्हाण २)अर्पिता वाडकर ३)सिया पायगुडे, ६०० मी-१)शिवानी ननावरे २) प्रियांका ओक्शा ३)काजल जॉनवल, लांब उडी-१)काजल मज्जी २)अर्पिता वाडकर ३)आरती घायवत, शॉट पुट-१) रोशनी मज्जी २) पूर्व जाधव.

१४ वर्षा खालील मुलं- १०० मी-१) बलराज परदेशी २)संवेज्ञ भाले ३)विदित भाले, ६०० मी-१)आकाश यादव २)आर्यन उबाळे ३) संकेत किरगत, लांब उडी-१)बलराज परदेशी २)आकाश यादव ३)विदित भाले, शॉट पुट-१) संवेज्ञ भाले २) आर्यन उबाळे.

१६ वर्षा खालील मुली-१०० मी-१)विशाखा पवार २)सायली किरगत ३)अश्विनी राऊत, २०० मी-१) स्नेहा मदने २) अश्विनी राऊत ३) सायली किरगत, १००० मी-१)संचित मोरे २)सांगून देसाई ३)दीपाली तुपे, लांब उडी-१)प्रतीक्षा वसके २)रुपाली जाधव, शॉट पुट-१)रसिका तार्डे २)गीता वेलणकर ३)साक्षी खुटाळे, भाला फेक-१)गीता वेलणकर.

१६ वर्षा खालील मुलं- १०० मी-१)कौस्तुभ पाटील २)श्रीपाद लेकुरवाळे ३)लखन जमधडे, २०० मी-१)कृष्णा ठोंबरे २)शुभम अरसुले ३)कौस्तुभ पाटील, ४०० मी-१)प्रभाव राजपूत २)शारुख शेख, १००० मी-१)प्रभाव राजपूत, लांब उडी-१)शुभम अरसुले २) कृष्णा ठोंबरे ३) तेजस शिरसे.

स्पर्धेत तांत्रिक प्रमुख म्हणून साईचे अॅथलेटिक्स कोच सुब्बा राव यांच्या मार्गदर्शन खाली प्रा अनिल निळे आणि क्रीडा प्रभोधीनीच्या अॅथलेटिक्स कोच पूनम नवगिरे यांनी काम पहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here