३ लाख शेतकऱ्यांची माहिती अपलोड

0

 

कोल्हापूर :  पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन लाख आठ हजार ४०२ पात्र शेतकरी कुटुबांची माहिती सरकारच्या एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.

पत्रकात म्हटले आहे, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुबांना केंद्र सरकारकडून प्रत्येक वर्षी सहा हजार जमा करणार आहे. ही रक्कम तीन टप्यात जमा होईल. योजनेच्या अंमलबजावणीचे काम महसूल प्रशासनातर्फे दोन आठवड्यापासून होत आहे. पात्र शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात येत आहे. जिल्ह्यात तीन लाख, ७६ हजार ४३९ पात्र शेतकरी कुटुंब आहेत. त्यापैकी तीन लाख, आठ हजार ४०२ कुटुबांची माहिती अपलोड करण्यात आली. करवीरमध्ये ४१ हजार ६२९, गगनबावड्यात चार हजार ३३१, पन्हाळ्यात २६ हजार ९८९, शाहूवाडीत १३ हजार ८२७, हातकणंगलेत ३२ हजार ८१२, शिरोळमध्ये ३५ हजार ५२५, राधानगरीत २९ हजार ४९५, कागलमध्ये ३२ हजार ८११, भुदरगडमध्ये २२ हजार ८८६, आजऱ्यात १६ हजार ५, गडहिंग्लजमध्ये २७ हजार २०५, चंदगडमध्ये २४ हजार ८८७ शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here