दलित महासंघ: ऐतिहासिक लोकचळवळ

दलित महासंघ 26 व्या वर्षात पर्दापण

0

 


महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींचा इतिहास तपासत असताना ज्या काही सामाजिक संघटनेची अगक्रमाने नावे घ्यावी लागतील, त्यामध्ये दलित महासंघाने नांव अग्रस्थानी आहे. दलित पॅंथरच्या विघटनानंतर सामाजिक चळवळीत एक पोकळी निर्माण झालेली होती. ती पोकळी दलित महासंघाच्या रूपाने भरून आली. फुले, शाहू, आंबेडकर आणि अण्णा भाऊ यांच्या समतावादी विचारांवर चालणा-या दलित महासंघाच्या सामाजिक संघटनेची स्थापना 5 जुलै 1992 ला कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चैकात झाली. विविध जाती समूहांना एकत्र करून त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराविरूध लढण्याचे साहस विविध समुहांना दलित महासंघ या सामाजिक संघटनेने दिलेले आहे. या संघटनेची स्थापना महाराष्ट्रातील तमाम उपेक्षितांचा आवाज, घणाघाती वक्ते, सामाजिक घटनांचे अभ्यासक, जेष्ठ विचारवंत प्रा. डाॅ. मच्छिंद्र सकटे यांनी केलेली आहे.दलित महासंघाचा सिम्बा्ॅल हा जंगलचा राजा ‘सिंह‘ असून अभिवादनाचा शब्द ‘जय भारत‘ आहे. तर झेंडा निळा रंगाचा वारकरी भगव्या पताक्या प्रमाणे आहे. झेडयाची बाॅर्डर पिवळया रंगाची आहे. दलित महासंघाने आपल्या वैशिष्टयपूर्ण आंदोलनांनी महाराष्ट्रात एक झंझावात निर्माण केलेला आहे. सर्वच वंचित घटकांना सोबत घेवून व्यवस्था बदलाची लढाई लढून समता प्रस्थापित व्हावी यासाठी दलित महासंघ नेहमीच अग्रेसर राहिला आहे. दलित महासंघाचे नेतृृत्व करणारे नेते हे उच्चशिक्षित व उच्चविद्याविभूषित असल्यामुळे आंदोलने – मोर्चे इत्यांदींना एक वेगळया प्रकारची उंची प्राप्त होत असते. आक्रमकता आणि वैचारिक परिपूर्णता यांची सांगड या संघटनेच्या कार्यात सतत दिसत असते. त्यामुळेच फक्त प्रसिध्दीसाठी आक्र्रमकता न दाखवता प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे दलित महासंघाच्या कार्यकत्यांची भर असतो. दलित महासंघाने या वर्षी 26 व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. एखादी सामाजिक संघटना 26 वर्षे कार्यरत राहणे ही साधी घटना नाही. सामाजिक संघटनेमध्ये अनेक प्रकारचे वाद-विवाद, मते-मतांतरे, संघर्ष घडताना आपण पाहत असतो. परंतू दलित महासंघ ही संघटना 26 व्या वर्षात पर्दापण करित आहे याचे ़श्रेय हे रा़त्र दिवस राबणा-या कार्यकत्र्यांना आणि या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डाॅ. मच्छिंद्र सकटे यांच्या सक्षम नेतृत्व गुणाला जाते. दलित महासंघ ही सामाजिक संघटना सर्वच वंिचत, उपेक्षित घटकांची आहे. परंतु सर्वाधिक जनाधार हा मातंग समाजाचा आहे, म्हणून काही ती एकजातीय संघटना नाही. दलित चळवळ ही पूर्वी फक्त विशिष्ट जातीपूरतीच मर्यादित होती, परंतू ही चळवळ दलितांच्या गल्लीतून पुढे नेत भटक्यांच्या पासून ते मुस्लिमांच्या मोहल्यापर्यंत नेण्याचे काम दलित महासंघाने केलेले आहे. प्रा. डाॅ. मच्छिंद्र सकटे यांचे सक्षम नेतृत्व लाभल्यामुळे दलित महासंघावर विश्वास ठेवून काम करण्याची संख्या ही मोठी आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक, आध्रप्रदेश आणि गोवा या राज्यातील वंचित उपेक्षित घटक ही दलित महासंघाच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. दलित महासंघाला जरी मातंग समाजाचा मोठया प्रमाणात जनाधार असला तरी फक्त मातंग समाजाच्या विकासाचा विचार या संघटनेने मांडलेला नाही तर याउलट मातंग समाजासह सर्वच दलित, उपेक्षित, भटके, आदिवासी, अल्पसंख्यांक, देवदासी, जोगती, इत्यांदीच्या उन्नतीची भूमिका दलित महासंघाने घेतलेली आहे. संकुचित न रहता जे जे म्हणून या व्यवस्थेखाली दबलेले आहेत, पिचलेले आहेत, मूख्य प्रवाहापासून बाजूला फेकले गेलेले आहेत, अन्याय अत्याचारग्रस्त आहेत ते ते आपले म्हणून त्यांना सोबत घेवून दलित महासंघ  न्यायाची, समतेची आणि विचारांची लढाई करित आहे. लोकशाहीच्या मूल्यांवर दलित महासंघाचा जरी विश्वास असला तरी बुळबुळीत लोकशाही यांना मान्य नाही. कल्याणकारी राज्य अथवा समतावादी राज्यव्यवस्था आस्तित्वात यावी यासाठी दलित महासंघाचे छावे रात्र दिवस इथल्या व्यवस्थेशी प्रतिकार संघर्ष करताना दिसत आहेत.लक्षवेधी आंदोलने परिषदा मोर्चे लक्षवेधी आंदोलने हे दलित महासंघाचे एक वैशिष्टय आहे. आक्रमक आणि जहाल आंदोलने असली तरी देखील त्याचा पाया हा वैचारिकच असतो. दलित महासंघाने अशी अनेक आंदोलने राज्यभर केलेली आहेत. त्यापैकी कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हातील मंदिर प्रवेशाचे आंदोलने खूप गाजली. कोल्हापूरातील हिटणी, हेब्बाळ, आणि त्या परिसरातील मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता. या प्रवेशासाठी दलित महासंघाने केलेले आंदोलने विशेष गाजलेली आहेत. त्याचबरोबर शाहू महाराजाच्या कोल्हापूर नगरीतील वडणगे येथील जातीय दंगल, वाटेगांव येथील अण्णा भाऊ साठे स्मारकाचे आंदोलन, पायताण मोर्चे, लाठी मोर्चे, कुÚहाड मोर्चे, आसूड मोर्चे, टमरेल मोर्चे, दंडवत मोर्चे, नामांतर परिषद, ख््िराचन परिषद, क्रांती परिषद, अॅट्राॅसिटी मोर्चा, पाणी परिषद, पाणी यात्रा, स्वाभिमान परिषद, शेण फेको आंदोलने, देवदासी परिषद, काळी गुढी उभारून निषेध,  मुख्यमंत्री- मंत्र्यांनी काळे झेंडे दाखवणे, पवन परिषद पर्यावरण रक्षणसाठी परिषद, जलसमाधी आंदोलने, चपाती मोर्चाे, हालगी मोर्चाे, अमर शेख स्मारक प्रश्न,गोलमेज परिषदा इत्यादी अनेक परिषदा, मार्चाे, सभा, संमेलने , धरणे आंदोलने दलित महासंघाच्या या कार्याची अनेक विचारवंत, संशोधक, अभ्यासक यांनी नांेद घेतलेली आहे. महाराष्ट्रातील काही विद्यापीठांच्यामध्ये दलित महासंघाच्या कार्यावरती एम. फिल, पी. एच. डी, चालू आहेत. हि दलित महासंघाच्या कामाला मिळालेली पोच पावतीच अगर सन्मान म्हणावा लागेल. दलित महासंघाने वेगवेगळया क्षेत्रात काम करण्यासाठी काही आघाडया तयार केलेल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यासाठी यु.एस.ए, (युनिव्हर्सिटी स्टूडंन्ट असोसिएशन) ही विद्यार्थी आघाडी स्थापन केलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठात सक्षमपणे यु.एस.ए, काम करीत आहे. सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्यासाठी  ‘समतावादी सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र‘ ही संघटना काम करीत आहे. या आघाडीच्या वतीने आतापर्यंत 5 समतावादी सांस्कृतिक संमेलने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात झालेली आहेत. त्याच बरोबर समतावादी महिला मंच ही महिला आघाडीदेखील काम करीत आहे. त्याच बरोबर कर्मचारी संघटना देखील दलित महासंघाची एक आघाडी म्हणून काम करीत आहे. गेल्या 25 वर्षाचा मागोवा घेत असताना दलित महासंघाने अनेक चढ उतार पाहिलेले आहेत. सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात अनेक पक्ष संघटना आपआपल्या परिने काम करित असतात. परंतु सक्षम नेतृत्व नसल्यामुळे अपेक्षित काम त्या करू शकत नाहित. परंतु दलित महासंघाला  प्रा. डाॅ. मच्छिंद्र सकटे यांच्यासारखे उच्यविद्याविभूषित विचारी व संयमी नेतृत्व लाभल्यामुळे दलित महासंघ अत्यंत सक्षमपणे कार्यरत आहे. इतर पक्ष संघटने प्रमाणे कांही प्रमाणात फुटीची लागण दलित महासंघाला देखील झालेली आहे. परंतु दलित महासंघाच्या मुख्य प्रवाहापासून विभक्त झालेल्यांना कोणतेही प्रभावी काम करता आलेले नाही. या उलट दलित महासंघ मात्र कोणत्याही संकटाने विचलित न होता आपले व्यवस्था परिवर्तनाचे कार्य अधिक जोमाने व सक्षमपणे करित आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हांत दलित महासंघाचे कार्यकर्ते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जावून त्यांना समतावादी व्यवस्था निर्माण करण्याच्या कार्यात सोबत घेवून मोठया जोमाने काम करीत आहेत. आणि डाॅ. बाबासाहेबांचा व्यवस्था परिवर्तनाचा अन् समतेचा गाढा पूढे घेवून जात आहेत.


– अमोल महापुरे, कोल्हापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here